Bleach | ब्लिच

Details

ब्लिचिंग ही लव लपवण्यासाठीची एक रीत आहे. त्वेचेवर असलेल्या लवमुळे त्वचा थोडीशी रफ व काळवट दिसते. ब्लिचिंग मुळे त्वचेवरील हा काळवटपणा नाहीसा होतो. कारण ब्लिच हे स्किनच्या लवीच्या (केसांचा) कलर लाइट करते. जर लव कमी असेल आणि ती काढावयाची नसेल तर ब्लिचिंग करुन लपविता येते.
ब्लिचिंगचे प्रकार :
1. पावडर ब्लिचिंग :
2. क्रीम ब्लिचिंग :
क्रिम ब्लिचिंगमुळे त्वचा मऊ व नितळ होऊन केसांचा रंग छान सोनेरी होतो. क्रिम ब्लिचिंग दोन महीने तरी टिकते.
क्रीम ब्लिचिंग मध्ये...
» सर्व प्रथमः आम्ही आपल्या स्किन टाईप नुसार ब्लीच निवडतो.
» स्किन टाईप नुसार क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» प्री-ब्लिच लोशन चे काही थेंब चेहरा व गळ्यावर टाकून ते सर्वत्र बोटाने पसरवतो.
» ब्लिच क्रिम व ब्लिच ऑक्टिवेटर हे मिक्स करून ते मिश्रण चेहरा व गळा यावर स्पॅचुलाच्या साहाय्याने अॅप्लाय करतो.
» ते स्किन टाईप नुसार काही वेळ ठेवून स्पॅचुलाच्या साहाय्याने काढून स्पंजने वाईप करतो.
» मग ब्युटी ग्लोब काही वेळ चेहऱ्यावर फिरवतो.
» आणि लास्ट पोस्ट ब्लिच लोशन चे काही थेंब चेहरा व गळ्यावर टाकून ते सर्वत्र बोटाने पसरवतो.
» आणि लास्ट स्किन टाइप नुसार “सनस्क्रीन लोशन लावतो.