Facial | फेशियल

Details

ही सौंदर्य़ासाठीची महत्वाची ट्रिटमेंट आहे. ती तनामनाला आराम देते. फेशियल केल्याने स्किन फ्रेश आणि डेलिकेट होते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते,मसल्स ( स्नायूं ) ना टोनअप करते. निष्क्रिय ग्रंथीना सक्रिय करते. ते स्किनचे मॉईश्चर लेवल बॅलन्स करते. फेशीयल लिम्फँटिक कचरा बाहेर काढण्यास मदत करते. यामुळेच स्किन यंग ठेवण्यासाठी मदत होते.

थोडक्यात सांगायचे तर …चेहर्‍याची त्वचा नितळ , निर्मळ, निस्तेज आणि सतत टवटवीत रहावी म्हणून फेशीयल करणे महत्वाचे ठरते. फेशीयल केल्याने उतार वयात पडणाऱ्या सुरकुत्या ही पुढे ढकलल्या जातात व स्किनची लवचिकता वाढ़ायला मदत होते .
यामध्ये…
» सर्व प्रथम आपल्या स्किन टाईप नुसार फेशियल निवडतो.
» क्लींन्झिंग घेऊन फेस क्लीन करतो.
» स्क्रब फेस वर अप्लाय करून स्किन प्रॉब्लेम नुसार हॉट /कोल्ड स्टीम देतात आणि स्किनच्या योग्य ते नुसार प्रेशर देऊन काही मिनिटे हॅन्ड मसाज करून वाइप करतो.
» टोनर मॉइस्ट कॉटनच्या सहाय्याने फेसवर टॅब करतो.
» फेसवरती ट्रान्सफरन्ट जेल अॅप्लाय करून “गॅलव्हनीक मशीन” काही मिनिटे वापरल्यानंतर ‘फिंगरच्या सहाय्याने प्रेशर -पॉइन्टस्’ वर मसाज करुन वाइप करतो.
» मसाज क्रिमचे प्रॉडक्ट फेस वर अॅप्लाय करून”अल्ट्रासॉनिक मशीन” काही मिनिटे वापरल्यानंतर ‘फिंगरच्या सहाय्याने प्रेशर -पॉइन्टस्’ वर काही मिनिटे मसाज करुन वाइप करतो.
» लाइटनिंग साठी फेस पॅक लावुन तो काही वेळेनंतर रिमूव्ह करतो.
» लास्ट स्किन टाइप नुसार “सनस्क्रीन लोशन लावतो.