A) Global color
केसांना नँचरल कलर असतो. केस नेहमी नँचरल दिसावेत, यासाठी संशोधकांनी टेक्नालॉजीद्वारे त्याला प्रोफेशनल कलरचे लुक दिलेले आहे. हेअर कलर मुळे व्यक्तिमत्व उठावदार होते. हेअर कलर व्यक्तिचा व्यवसाय, हेअर क्वालिटी, स्किन टोन आणि बाँडीलँग्वेजच्या आधारे करण्यात येते. हेअर कलर मुळे केसात लाइटनिंग येते.
◆ हेअर कलरच्या दोन पद्धत आहेत :
(१) ग्लोबल कलर
(२) हायलाइट्स
(१) ग्लोबल कलर : ग्लोबल कलर म्हणजे सर्व केस कलर करण्याची रीत. ग्लोबल कलर व्हाइट केसांसाठी आणि केसांच्या नँचरल कलरला लाइट अथवा डार्क करण्यासाठी वापरण्यात येतो. ग्लोबल कलर केसांच्या नँचरल कलरला मँचिंग किंवा थोडा लाइटही करु शकतो. स्किन टोन(त्वचेचा रंग) आणि व्हाइट केस यानुसार ‘हेअर स्टायलिस्ट’ हा कलर करतात.
ग्लोबल कलरमध्ये …
१. ब्लँक,नॅचरल ब्लँक, डार्क ब्राऊन,मेडिअम ब्राऊन, लाईट ब्राऊन,डार्क ब्लाँन्ड, मेडिअम ब्लाँन्ड,लाईट ब्लाँन्ड,व्हेरी लाइट ब्लाँन्ड,व्हेरी व्हेरी लाइट ब्लाँन्ड इतर …
यामध्ये…
» सर्व प्रथम हेअर एन्यालिसीस(केस विश्लेषण) करतो.
» प्युरिफाइंग शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टॉवेल ड्राय करतात व केस मोठे असल्यास पिनअप करतो.
» आपल्या स्किन टोन नुसार हेअर कलर निवडल्या नंतर तो ब्रशच्या साहाय्याने केसावर सेक्शन बाय सेक्शन अॅप्लाय करतो.
» मग तो कलर व्हाईट केसाच्या टक्केवारी नुसार काही वेळ ठेवून केस वॉश करतो.
» केसांना ड्रायनेस(कोरडेपणा) येऊ नये म्हणून केसाला कंडिशनर अप्लाय करतात व ते केसानुसार काही वेळ ठेवून मग केस वॉश करतो.
» आणि लास्ट केसांना ब्लो ड्राय करून सिरम अॅप्लाय करतो.
- B) Highlight color
केसांच्या मूळ रंगापेक्षा जास्त लाइट शेडने ३० टक्के ते ५० टक्के हेअर वेगवेगळ्या पद्धतींनी करण्यात येणा-या कलरला ‘हायलाइट्स’ असे म्हणतात.
● हायलाइट्समध्ये …
हनी , ब्लाँन्ड ,आमन्ड ,काँपर , सिनमन , रेड, मँजन्टा रेड , काँपर रेड , अँश ब्लाँन्ड , सिल्व्हर ब्लाँन्ड , प्लँटिनम ब्लाँन्ड , ग्रे आइसबर्ग ,मिल्की पर्ली ब्लाँन्ड …… गोल्डन, गोल्ड येल्लो , ग्रीन, ब्लू, पिकॉक ग्रीन , रोझ रेड , पिंक,वगैरे कलर आहेत.
यामध्ये…
» आम्ही सर्व प्रथम हेअर एन्यालिसीस(केस विश्लेषण) करतो.
» प्युरिफाइंग शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टॉवेल ड्राय करतो व केस मोठे असल्यास पिनअप करतो.
» जे केस कलर करावयाचे आहेत त्या केसांना प्रिलाईटनिंग करून घेतो.
» आपल्या स्किन टोन नुसार हेअर कलर निवडतो.
» मग ज्या केसांना कलर करावयाचा आहे त्या केसांना फॉईल पेपर लावुन ब्रशच्या साहाय्याने कलर केसावर अॅप्लाय करतो.
» मग तो कलर केसाच्या क्वालिटी & प्रकारा नुसार काही वेळ ठेवून केस वॉश करतो.
» केसांना ड्रायनेस(कोरडेपणा) येऊ नये म्हणून त्या केसाला कंडिशनर अप्लाय करतो व ते केसानुसार काही वेळ ठेवून मग केस वॉश करतो.
» आणि लास्ट केसांना ब्लो ड्राय करून सिरम अॅप्लाय करतो.