Makeup | मेकअप

Details

सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करुन स्री-पुरुषांच्या सुंदरतेला अधिक सुंदर बनवण्याच्या पद्धतीला ‘मेक-अप’ असे म्हणतात. मेकअपचा अर्थ चेहऱ्याची रंगरंगोटी नव्हे तर आपल्या चेहऱ्यात जे दोष आहे ते सौंदर्य प्रसाधनाच्या साहाय्याने भरून काढ़ने किंवा झाकने. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढुन चेहरा योग्य व आकर्षक वाटतो आणि आत्मविश्वास वाढतो.

यामध्ये…
» सर्व प्रथमः CTML करतात.
» C म्हणजे क्लींन्झिंग…स्किन टाईप नुसार घेऊन फेस क्लीन करतो.
» T म्हणजे टोनर…. बॅक्टरीया इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्किनचे पोर्स लॉक करण्यासाठी स्किन टाईप नुसार घेऊन
मॉइस्ट कॉटनच्या सहाय्याने फेसवर टॅब करतात. किंवा स्प्रे बॉटलच्या साहायाने स्प्रे करून नंतर वाईप करतो.
» M म्हणजे मॉइश्चरायझर…. स्किनचा ph बॅलन्स Maintain राहण्यासाठी स्किन टाईप नुसार घेऊन फेस वर अपवर्ड पद्धतीने अॅप्लाय करतो.
» L म्हणजे लिपबाम ….ओठ गुलाबी,मुलायम राहण्यासाठी ओठावर अॅप्लाय करतो.
» CTML झाल्यावर, मेकअपच लास्टिंग(टाकण्याचा कालावधी) जास्त राहण्यसाठी व घाम कमी येण्यासाठी हे प्राइमर घेऊन फेस वर अॅप्लाय करतो.
» स्किन टोन(त्वचेचा रंग) व स्किन प्रॉब्लेम(पिंपल्स, डाग, खाच खळगे) नुसार कन्सिलर निवडून ते ब्रशच्या साहाय्याने फेस वर अॅप्लाय करतो.
» स्किन टोन नुसार फाउंडेशन निवडून ते ब्युटी ब्लेंडर च्या साहाय्याने टॅब करतो.
» कॉम्पॅक्ट पावडर हे स्किन ला घाम आल्या नंतर शोषून घेण्याचे काम करते तसेच मेकअप इ व्हन(एकसारखा) दिसतो. हे प्रॉडक्ट स्पंज च्या साहाय्याने टॅब करत अॅप्लाय करतो.
» ट्रासन्सलुसन्ट पावडर स्पंज च्या साहाय्याने टॅब करत अॅप्लाय करतो.
» मेकअप फिक्सर स्प्रे सेटिंग हे स्किन वरती ‘मेकअप फिक्स होण्यासाठी’ स्प्रे करतो.