नैसर्गिक कुरळ्या केसांना सरळ करावयाच्या रितील स्ट्रेटनिंग म्हणतात. स्ट्रेटनिंग दोन तऱ्हांनी करतात :
1. टेम्पररी स्ट्रेटनिंग 2.पर्मनंट स्ट्रेटनिंग
टेम्पररी स्ट्रेटनिंगला आयर्निंग पण म्हणतात. ते पुन्हा केस धुवे पर्यंत टिकते. पर्मनंट स्ट्रेटनिंगमध्ये आतून जे नवे केस उगवतील त्यात अगोदरच्या केसांचा ओरिजनल ग्रोथ येतो.
पर्मनंट स्ट्रेटनिंग मध्ये…
» आम्ही ट्रिटमेन्ट सुरू करण्यापूर्वी हेअर एन्यालिसीस(केस विश्लेषण) करतो.
» हेअर एन्यालिसीस नुसार प्रॉडक्ट निवडतो.
» प्युरिफाइंग शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घेतो.
» केस खराब होऊ नये म्हणून प्रिट्रीटमेंट प्रॉडक्ट वापरतो.
» केसांना स्ट्रेट ब्लो ड्राय करतो.
» स्ट्रेटनिंग क्रीम केसावर सेकशन बाय सेकंशन अप्लाय करतो.
» मग ती क्रीम केसानुसार काही वेळ ठेवून केस वॉश करतो.
» केसांना ड्रायनेस(कोरडेपणा) येऊ नये म्हणून केसाला मास्क अप्लाय करतो व तो केसानुसार काही वेळ ठेवून मग केस वॉश करतो.
» परत केसांना ब्लो ड्राय करतो.
» मग केसानुसार आयरनिंग मशीनचे टेम्प्रेचर ठेवून ते सेक्शन बाय सेक्शन केसावर मारतो.
» मग सेक्शन बाय सेक्शन केसावर न्यू्ट्रलाइझर लावतो व काही वेळेनंतर केस वॉश करतो.
» केसाला पुन्हा मास्क अँप्लाय करतो व तो केसानुसार काही वेळ ठेवून मग केस वॉश करतो.
» केसाला सिरम अँप्लाय करून स्ट्रेट ब्लो ड्राय करतो.