शाम्पू-कंडिशनर(Shampoo conditioner)
1)कन्झुमर शाम्पू-कंडीशनर(Consumer Shampoo Conditioner)
केसांना शाम्पू वापरल्यामुळे केसाचा पहिला लेअर म्हणजे क्यूटिकल हा भाग ओपन होऊन त्यातील धूळ(Dust) बाहेर येते. परंतु हे शाम्पू केसावर कोटिंग(थर) तयार करते. कोटिंग तयार झाल्यामुळे केसातील मॉइश्चर(ओलावा) कमी होते. त्यामुळे केस आपल्याला थोडेशे ड्राय(कोरडे) वाटू लागतात. तसेच कोटिंग मुळे केसांची जाडी ही वाढते त्यामुळे ते नॅचरल(नैसर्गीक) फ्लो मध्ये न दिसता रफ,चरबट जाणवतात.
कन्झुमर(Consumer) शाम्पू-कंडीशनर च्या वापराने केसांवर झालेल्या कोटिंग(थरा) मुळे बऱ्याच वेळा प्रोफेशनल कलर व केमिकल ट्रीटमेंट(स्ट्रेटनिंग,केराटीन ,हेअर स्पा,हायलाईट कलर) चा चांगला रिझल्ट मिळत नाही.
2)प्रोफेशनल शाम्पू-कंडीशनर(Professional Shampoo Conditioner)
● शाम्पू(Shampoo):
केसांना शाम्पू वापरल्यामुळे केसाचा पहिला लेअर म्हणजे क्यूटिकल हा भाग ओपन होऊन त्यातील धूळ(Dust) बाहेर येते. परंतु हे शाम्पू केसावर कोटिंग(थर) तयार करत नाही कोटिंग न झाल्यामुळे केसातील मॉइश्चर(ओलावा) जास्त प्रमाणात कमी होत नाही. त्यामुळे केस आपल्याला जास्त प्रमाणात ड्राय(कोरडे) जाणवत नाही. तसेच कोटिंग न झाल्यामुळे केसांची जाडी ही वाढत नाही त्यामुळे ते नॅचरल(नैसर्गीक) फ्लो मध्ये दिसतात म्हणजेच रफ,चरबट जाणवत नाही.
शाम्पू ने केस व डोक्याची त्वचा स्वछ होते. केसांचा ph balance(पीएच बॅलन्स) हा 3.5 – 4.5 असा असतो. परंतु केसांना शाम्पू केल्यास तो ph balance 9 पर्यंत पोहचतो त्यामुळे केस थोडेसे ड्राय(कोरडे) जाणवतात. तर हा ड्रायनेस(कोरडेपणा) कंडिशनर ने घालवता येतो.
● कंडीशनर(Conditioner ) :
शाम्पू मुळे केसांचा ओपन झालेला थर( लेअर) कंडिशनर लावल्याने पुन्हा लॉक होतो. तसेच केसांचा Uneven(असमान) झालेला PH balance(पीएच बॅलन्स) पुन्हा 3.5 – 4.5 वरती येतो. त्यामुळेच केसांचा ड्रायनेस(कोरडेपणा) कमी होऊन केस सॉफ्ट,सिल्कि आणि शायनी होतात. यामुळेच शाम्पू वापरल्यानंतर कंडीशनर वापरने गरजेचे ठरते.
प्रोफेशनल शाम्पू-कंडीशनर मधील काही कंपन्या-
* मॅट्रिक्स शाम्पू (Matrix)
* लॉरेअल शाम्पू (Loreal )
* वेल्ला शाम्पू (Wella )
* सॉचकोफ़ शाम्पू (schwarzkopf )
* डी फॅबुलस (De Fabulous)
* Kerastase (केरासटस)
* Kama(कामा)
शाम्पू-कंडिशनर चा वापर –
शाम्पू :
१. शाम्पू वापरताना ?
१. शाम्पूचा वापर आठवड्यातून किती वेळेस करावा?
– दोन ते तीन वेळेस
२. केस धुण्यासाठी शाम्पू वापरण्या पूर्वी काय काळजी घ्यावी ?
– शाम्पूने केस धुण्याच्या ३० ते ४५ मिनिटे आगोदर केसाला कोमट तेल वापरून 2 ते 5 मिनिटे मसाज करावी. यामुळे
डोक्याच्या त्वचेला पोषण मिळून केसाची चमक टिकून राहते व केस खराब होत नाही.
३. शाम्पूने केस कसे धुवावे ?
१. सर्व प्रथम केस पाण्याने ओले करून घ्यावे.
२. अर्धा मग किंवा एक मग कोमट पाणी घेवुन त्यात एक रुपयाच्या शिक्क्या प्रमाणे शाम्पू टाकून ते पाणी चांगले ढवळावे
(एकत्र करावे) आणि त्या पाण्याने केस एक मिनिटा पर्यंत स्वच्छ धुवावेत.
३. केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत. त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो.
४. केस मोकळे सोडून मगच धुवावेत.
५. केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. कोमट पाण्यानेच शक्यतो केस धुवावेत.
६. केस खूप खसखसून धुऊ नयेत. हलक्या हाताने पण स्वच्छ धुवावेत.
२. शाम्पूचा वापर केल्यानंतर ?
१. केस कोरडे करण्यासाठी किंवा वाळवण्यासाठी
– केस धुतल्यानंतर नैसगिर्कपणे कोरडे होवू द्यावे. केस धुवून झाल्यानंतर कोरडया पण मऊ कापडाने हळूवार पुसावेत. ओले
असल्यास डोक्याला ५ ते ७ मिनिटे टॉवेल बांधावा. ड्रायरचा वापर करायचाच असल्यास Hit medium आणि Blow
full ठेवावा.
२. ओले केस
– ओले केस कधीही विंचरू नयेत. केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. केस विंचरताना कमरेत वाकून केस चेहऱ्यावर
आणावे आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरावे.
३. केसाला कंगवा
– केस विंचरण्यासाठी कंगवा वापरा. आजकाल ची मुले स्टायलिश कटींगमुळे केसांना कंगवा हा लावत नाही , पण केसाला
कंगवा वापरने अतिशय महत्वाचे आहे. हव तर तुम्ही आगोदर केसाला कंगवा वापरा आणि नंतर लगेच परत केस हाताने
विंचरा. केसांची लाइफ(आयुष) चांगली टिकवून ठेवण्यासाठी आणि रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी
दिवसातून ५ ते १० वेळा केसांत कंगवा फिरवणे आवश्यक आहे.
सूचना : शाम्पू हा १४ वर्षा पुढील व्यक्तिनेच वापरावा.(हो पण बेबी शाम्पू असेल तर लहान मुलही ते वापरु शकता.)
कंडिशनर :
1. कंडीशनर वापरताने –
1. कंडीशनर हे केव्हा वापरावे ?
– कंडीशनर हे शाम्पू केल्यानंतर वापरावे .
2. कंडीशनर वापरण्या आगोदर काय काळजी घ्यावी ?
– केसाला कंडीशनर वापरण्या आगोदर केसातील शाम्पू पूर्णतः काढून घ्यावा.
३. कंडीशनर कसे वापरावे ?
– शॅम्पू केल्यानंतर…केस थोडेसे ओलसर ठेवून, एक रुपयाच्या शिक्क्या प्रमाणे कंडिशनर एका हातावर घेवुन दोन्ही हात एकमेकावर
फिरवून ते हात केसावर सर्वत्र फिरवावे व ते कंडिशनर एक ते तीन मिनिटे केसा मध्ये राहु द्यावे. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून
घ्यावे.
४. कंडिशनर लावताना –
१. केसाला कंडिशनर लावताना कानाच्या मागील केसांपासून केसांच्या टोकापर्यंत लावावे.
२. डोक्याच्या त्वचेला कंडिशनर लावू नये. शॅम्पू जसा आपण वापरतो तस कंडिशनर वापरू नये.
५. कंडीशनर धुताना –
१. केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र धुवू नयेत. त्यामुळे केसांत गुंता होवू शकतो.
२. केस मोकळे सोडून मगच धुवावेत.
३. केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. कोमट पाण्यानेच शक्यतो केस धुवावेत.
४. केस खूप खसखसून धुऊ नयेत. हलक्या हाताने पण स्वच्छ धुवावेत.
५. केस धुवून झाल्यानंतर कोरडया पण मऊ कापडाने हळूवार पुसावेत. ओले असल्यास ५ ते ७ मिनिटा साठी कापडाने सैलसर
बांधावेत.
२. कंडीशनर वापरल्या नंतर –
१. केस कोरडे करण्यासाठी किंवा वाळवण्यासाठी
– केस धुतल्यानंतर केस नैसगिर्कपणे कोरडे होवू द्यावे. केस कोरडे करण्यासाठी टॉवेलने घासून केस कोरडे करू नयेत. डोक्याला
पाच ते सात मिनिटे टॉवेल बांधावा आणि हलक्या हाताने केस पुसावेत. ड्रायरचा वापर करायचाच असल्यास ड्रायरची Hit
Medium व blow full ठेवावा.
२. ओले केस
– ओले केस कधीही विंचरू नयेत. केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा. केस विंचरताना कमरेत वाकून केस चेहऱ्यावर आना
आणि मानेपासून केसांच्या टोकापर्यंत केस विंचरा.
३. केसाला कंगवा
– केस विंचरण्यासाठी कंगवा वापरा. आजकाल ची मुले या स्टायलिश कटींगमुळे केसांना कंगवा हा लावत नाही ,पण केसाला कंगवा
वापरने हे केसाच्या लाइफ साठी अतिशय महत्वाचे आहे. हव तर तुम्ही आगोदर केसाला कंगवा वापरा आणि नंतर लगेच परत केस
हाताने विंचरा. असे केलें तरी चालेल. रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी कमीत कमी दिवसातून २० ते २५ वेळा केसांत कंगवा
फिरवणे आवश्यक आहे. यामुळे केसाचे सौंदर्य वाढुन केसांची लाईफ(आयुष्य) वाढते.
सूचना : कंडीशनर हा १४ वर्षा पुढील व्यक्तिनेच वापरावा. (हो पण बेबी कंडीशनर असेल तर ते लहान मुलही वापरु शकता)
शाम्पू-कंडिशनर मधील काही प्रोफेशनल कंपण्या
* मॅट्रिक्स शाम्पू (Matrix)
* लॉरेअल शाम्पू (Loreal )
* वेल्ला शाम्पू (Wella )
* सॉचकोफ़ शाम्पू (schwarzkopf )
* डी फॅबुलस (De Fabulous)
* केरासटस(Kerastase)
* कामा(Kama )
हेअर ऑइल(केसांचे तेल)
केसांना हेअर सिरम किंवा मोरोक्कन/अरगण ऑइल वापरायचे नसल्यास कोणत्या केसाला कोणते तेल व ते कशे वापरावे
याची माहिती .
1. केसांच्या पोताप्रमाणे तेल निवडा –
A. नॉर्मल हेअर(सामान्य केस)
सामान्य पोताचे केस हे अति तेलकटही नसतात व रूक्ष(ड्राय) ही नसतात. अशा सामान्य केसांसाठी बदामाचे किंवा आवळ्याचे तेल लावणे उपयुक्त आहे.
B.ऑइली हेअर(तेलकट केस )
डोक्याच्या त्वचेमधून “सीबम‘ नामक तेलकट स्त्राव वाहत असतो. ‘सीबम’चे प्रमाण वाढल्यास केस तेलकट होतात. त्यामुळे
अशा प्रकारचे केस असणार्यांमध्ये ‘सीबम’चे प्रमाण आटोक्यात आणने गरजेचे आहे. म्हणूनच तेलकट केस असणाऱ्यांनी ऑलिव्ह किंवा तीळाचे तेल" लावणे हितकारी आहे.
C. ड्राय हेअर (कोरडे केस)
रूक्ष केस हे कमकुवत, निस्तेज असल्याने त्याला फाटे फुटण्याची शक्यता अधिक असते. रुक्ष केसांमध्ये स्निग्धता वाढवण्याची
गरज असते. म्हणूनच रूक्ष केस असणाऱ्यांनी बदाम, नारळ, तीळ किंवा मोहरीच्या तेलाने रोज 2 ते 3 मिनिटे मसाज करावी .
2. केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत –
– केस धुतल्यानंतर थोडेसे ओले केस असताना एका हातावर थोडेसे तेल घेवुन दोन्ही हात एकमेकावर फिरवून ते हात केसावर
फिरवा.
3. काळजी घ्या –
1) रात्रभर केसांवर तेल राहू देऊ नका कारण घाण जमून केस दुबळे होण्याची शक्यता असते.
2)दमट वातावरणात केसांना तेल अगदी थोडेसे लावा.
3) “ऑइली हेअर (तेलकट केस) पुन्हा तेल लावताना मसाज करणे टाळा.
4) तेल लावून झाल्यानंतर पाण्यात दोन मिनिटांसाठी टॉवेल भिजवून ठेवा. तो टॉवेल थोडासा पिळून घ्या टॉवेलनं केसांना 10
मिनिटां साठी झाकून (बांधून) घ्या. हा एक उत्तम मार्ग आहे. हा नैसर्गिक स्पा आहे. यामुळे केसांमध्ये तेलाचे योग्यरित्या पोषण होते व
केसांचे प्रॉब्लेम उद्भवत नाही.
4. तेला मधील काही प्रोफेशनल कंपन्या
1) wow
2) Parachute
3) khadi
हेअर सीरम
१. हेअर सीरम म्हणजे काय ?
सीरम हा एक नवीणच शब्द वाटतो. परंतु हा काही नवीन नाही. सीरम म्हणजे काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा ईतर काही नाही. हा
केसासाठी उपयोगात आणला जाणारा जुना शब्द आहे. सीरम हा सिलिकॉन वर आधारित घटकांवर , अमिनो ऍसिडस् , सिरामिडने
मिळून बनतो. सिलिकॉन डोक्याच्या त्वचे वर एक मास्क आणि एक प्लास्टिक च्या आवरणा सारखे काम करते.
२. हेअर सीरम कशासाठी वापरतात ?
– सीरम हे आपल्या केसासाठी वापरले जाते.
३. हेअर सीरम कोणत्या प्रकारच्या केसाला वापरता येते. ?
– हेअर सीरम सर्व प्रकारच्या केसासाठी वापरता येते.
४. हेअर सीरमच्या वापराने काय होते ?
– सीरम मध्ये असलेले सिलिकॉन केसाला चमकदार , मऊ ठेवते. सीरम मध्ये तेला सारख चिकट पणा नसतो कारण त्यामधील
सिलिकॉन हे केसा वर एक मास्क आणि एक प्लास्टिक च्या आवरणा सारखे काम करते. त्यामुळेच सीरमच्या वापराने केसाला धूळ
वगैरे चीटकत नाही. धूळ न चिकटल्यामुळे केस वेवी(नागमोडी) तसेच भूरके म्हणजेच ड्राय(कोरडे) न होता ते चमकदार दिसतात.
त्याच प्रमाणे उन्हा मध्ये सूर्याच्या किरणा पासून आणि प्रदुषणा पासून ही केसांचे संरक्षण होते आणि हो सिरम तेला प्रमाणे
चेहऱ्यावर उतरत नाही.
५. हेअर सीरम कशे वापरावे ?
– केस धुतल्यानंतर थोडेसे ओले केस असताना सीरमचे पाच थेंब आपल्या एका हातावर घेवुन दोन्ही हात एकमेकावर चोळून ते हात
केसावर फिरवा. (स्प्रे सिस्टीम चे सीरम असल्यास एकदाच हातावर प्रेस करावे ) नंतर आपले हात पाण्याने धुवून घ्या. हो पण सीरम
हे आपल्या डोक्याच्या त्वचेला रगडु नये. थोडक्यात सांगायचे म्हणजे सीरम चा वापर तेला प्रमाणे न करता हेअर जेल प्रमाणे करावा.
६. हेअर सीरम वापरताना केसाला तेल लावावे का ?
– दररोज सीरम वापरत असताना केसाला तेल लावू नये.
मात्र आठवड्यातून १ ते २ वेळेस वार ठरवून केसांना शाम्पू करण्याच्या ३० ते ४५ मिनिटे आगोदर स्टिकी (चिकट)
तेल(बदाम,नारळ,तीळ,मोहरी) घेऊन ते किंचिंत गरम करून 2 ते 5 मिनिटे डोक्याची हळुवार मसाज करावी. यामुळे रक्तप्रवाह
सुधारतो व केसांचे सौंदर्य वाढून त्यांची लाइफ(आयुष्य) ही वाढते.
७. हेअर सीरम मधील काही प्रोफेशनल कंपन्या
१) Matrix
२) Loreal
३)wella
मोरोक्कन, आरगन ऑइल
मोरोक्कन, आरगन ऑइल
-हे ऑइल केसांना चमकदार, मऊ ठेवण्या बरोबरच ड्राय(कोरडे), डैमेज(खराब) केसांना रिपेअर करण्याच काम करते. या ऑइल मध्ये, चिकट पणा नसल्यामुळेच केसाला धूळ वगैरे चीटकत नाही. धूळ न चिकटल्यामुळे केस वेवी(नागमोडी) तसेच भूरके म्हणजेच ड्राय(कोरडे) न होता ते चमकदार दिसतात. त्याच प्रमाणे उन्हा मध्ये सूर्याच्या किरणा पासून आणि प्रदुषणा पासून ही केसांचे संरक्षण होते आणि चेहऱ्यावर हे ऑइल उतरत नाही.
कशे वापरावे ?
– केस धुतल्यानंतर थोडेसे ओले केस असताना ऑइलचे पाच थेंब एका हातावर घेवुन दोन्ही हात एकमेकावर चोळून ते हात केसावर
फिरवा. (स्प्रे सिस्टीम चे सीरम असल्यास एकदाच हातावर प्रेस करावे ) नंतर आपले हात पाण्याने धुवून घ्या. हो पण हे ऑइल
आपल्या डोक्याच्या त्वचेला रगडु नये. थोडक्यात सांगायचे म्हणजे या ऑइलचा वापर रेगुलर तेला प्रमाणे न करता हेअर जेल
प्रमाणे करावा.
फेस वॉश/क्लींझर
फेसवॉश आणि क्लींझर हे दोन्ही प्रॉडक्ट त्वचा स्वच्छ करण्याचे कार्य करतात. पण फेसवॉश एक फोमिंग क्लींझर आहे तर क्लींझर किंवा क्लींझिंग मिल्क नॉन-फोमिंग ब्युटी प्रॉडक्ट आहे. फेसवॉशच्या तुलनेत क्लींझर १०० टक्के प्रभावी असते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. क्लींझर मुळे “त्वचा मॉइश्चराइझ होते आणि त्वचेची खोलवर स्वच्छता देखील होते”.
प्रदूषण, धूळ-माती,मेकअपशी वारंवार संपर्क येत असेल तर , सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी फक्त फेसवॉशचा वापर करावा आणि सायंकाळी क्लींझरचा वापर केल्यानंतर पुन्हा फेसवॉशचा वापर करावा.
प्रदूषण, धूळ-माती,मेकअपशी वारंवार संपर्क येत नसेल तर, सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस फेसवॉश वापर करावा.
● फेस वापरण्याची योग्य पद्धत :-
सर्व प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावे व मग संपूर्ण चेहरा(फेस) पाण्याने ओला करून एका हाताच्या तळव्यावर थोडासा
फेस वॉश घेवून एक मिनिटा पर्यंत बोटांच्या सहाय्याने खालून वरच्या/वरतून खालच्या दिशेने चेहरा हळूवार चोळत नंतर
पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्यावा.
● क्लिंझिंग मिल्क वापरण्याची योग्य पद्धत :-
हात स्वच्छ धुवून घ्यावे व मग संपूर्ण चेहरा(फेस) पाण्याने ओला करून एका हाताच्या तळव्यावर थोडेसे क्लींजिंग
मिल्क घेवून एक ते दोन मिनिटा पर्यंत बोटांच्या सहाय्याने खालून वरच्या दिशेने चेहरा हळूवार चोळत नंतर एक
कापसाचा तुकडा घेऊन ते पुसून घ्यावे.
हे नेहमी लक्षात ठेवा –
फेस वॉश किंवा क्लींजिंग मिल्क खरेदी करताने ते आपल्या त्वचे नुसार(स्किन टाइप) निवड़ावे. कोणतेही प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला देखील घ्यावा. चेहरा नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करावा. चेहरा धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नये. दिवसातून दोन वेळा फेसवॉश/क्लींजिंग मिल्कने आपला चेहरा स्वच्छ करावा. फेसवॉश हातावर घ्या आणि हलक्या हातानं चेहऱ्यावर लावा. चेहरा धुताना त्वचा कधीही रगडू नये. हलक्या हातानं मसाज केल्यास त्वचेवर जमा झालेली दुर्गंध सहजरित्या काढली जाण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह देखील वाढतो. तसंच चेहरा पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेलचा वापर करावा. चेहरा पुसतानाही त्वचेवर जोर देऊ नये. दुसऱ्या व्यक्तीचं टॉवेल चुकूनही वापरू नये.
फेस वॉश मधील काही प्रोफेशनल कंपन्या
1) Lotus
2) O3+
3) Cheryl’s
4) Raaga
सनस्क्रीन/ सनब्लॉक लोशन
हे ऊन, धूळ ,प्रदुषण या पासून संरक्षण करते.
सूर्याच्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून म्हणजेच UVA, UVB पासून स्किनचे संरक्षण करते. त्यामुळे स्किन टॅनिंगची(त्वचा काळी पडण्याची) समस्या होत नाही. याला SPF(सन प्रोटेक्शन फॅक्टर) ही म्हणतात.
● वापरण्याची पद्धत :-
हे प्रॉडक्ट घरा बाहेर पडण्याच्या 5 मिनिट अगोदर फेसवर टिपक्याच्या स्वरुपात लावून ते मर्ज(पसरवने) करावे. थोडक्यात
सांगायचे म्हणजे Fair&Lovely सारखे वापरावे.
सनस्क्रीन/ सनब्लॉक लोशन मधील काही प्रोफेशनल कंपन्या
1) Lotus professional
2) Raaga
3) Cheryls
4) La Shield
माँइश्चरायझर/कोल्ड क्रिम/नाइट क्रीम
वरील पैकी कुठलेही प्रॉडक्ट स्किनला रेजुविनेट करते म्हणजेच स्किनला सुरकुत्या पासून वाचवून स्किन सॉफ्ट(मुलायम) आणि फ्रेशनेस(टवटवीत) ठेवते. थोडक्यात सांगायचे तर उन, वारा, थंडी यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा जो नाहीसा होतो. त्यापासुन स्किनचे संरक्षण करण्यासाठी या प्रोड्क्टचा उपयोग होतो.
वापरण्याची पद्धत
माँइश्चरायझर/कोल्ड क्रिम/नाइट क्रीम हे नेहमी बोटांच्या सहाय्याने खालून वरच्या दिशेने चेहरा हळूवार चोळत लावावे. हो पण
शक्यतो रात्रीच वापरण्याचा प्रयत्न करावा.
मॉइश्चरायझर/कोल्ड क्रीम/नाइट क्रीम मधील काही प्रोफेशनल कंपन्या
1) O3+
2) Lotus
3) Lakme