About us

उद्दिष्ट (Vision) –

आपणास अविस्मरणीय सेवा देण्या बरोबरच बहुतांश जणांच्या खिशाला परवडणारे दर कायम ठेवणे.

ध्येय (Mission)-

सलोनच्या शाखा उपलब्ध करून रोजगार मिळवून देणे.

स्पेशालीटी

हेअर

स्किन

मेकअप

हे ध्येय प्राप्त करण्यासाठी मी म्हणजेच महेश पंडीत व माझा लहान भाऊ सतीश पंडीत ला हाताशी धरून काम शिकण्यासाठी आमचे वडिल व काका यांचे नेवासा येथे एकत्र सलोन दुकान असताने ही आम्ही नेवाशातील दुसऱ्यांच्या सलोन मध्ये, 4 वर्षांचा अनुभव घेतला. यानंतर दोघांनी नगर येथील प्रसिद्ध असलेले द ग्रूमिंग फॅक्टरी सलोन अँड अकॅडमी (The Grooming Factory Salon Academy) येथे अँडव्हान्स कोर्स (Advance Course) केला. गावाकडून सुरूवात करायची म्हणून नेवासा फाटा येथे, 2018 मध्ये, एम एस सलोन (MS Salon) नावाने प्रोफेशनल सलोन पुरुषांसाठी सुरू केले.

सलोन नविन असल्याने रिस्पॉन्स चांगला मिळत गेला त्यामूळे आमच्या ध्येया प्रमाणे आमच्या दोघांबरोबरच आणखी दोन व्यक्तींना आम्ही रोजगार प्राप्त करून दिला. सलोन मध्ये सोई सुविधा असल्या कारणाने इतर सलोन पेक्षा आमचे रेट थोडेसे जास्त होते. कदाचित रेट जास्त असल्या कारणाने 2019 मध्ये,ग्राहक पुन्हा कमी झाले. धंदा वर्षभर नफ्यात(Profit) नसताना,

2020 मध्ये,कोरोना व्हायरस मुळे लॉकडाउन झाले. उत्पन्न, (Income) बंद असताना खर्च (Expense) (दुकन भाडे,स्टाफ पेमेंट,इतर) चालूच होता.

काही महिन्यानंतर लॉकडाउन उघडले. परंतू सलोनला राज्य सरकारने परवानगी दिली नाही. कारण सर्व्हिस देताना संपर्क जास्त जवळ यायचा. आर्थिक परिस्थिती चांगली न राहिल्यामुळे आता दोन कर्मचाऱ्यांना (स्टाफ) पेमेंट करणे ही अवघड झाले होते यावर फार विचार करून नाई लाजाने घरीच व्यवसाय चालू करावा लागला.लोकांमध्ये, भीतीचे वातावरण असल्यामुळें व्यवसाय हा फक्त 40% ते 50% सुरु होता. यातही आम्ही समाधानी होतो. यात समाधान मानत असतानेच आमच्याकडे असणारे कर्मचारी (स्टाफ) काही दिवसानंतर म्हणू लागले की, सर पेमेंट आम्हाला 50% दिले तरी चालेल. पण कामावरती येऊ द्या. त्यांच्या अश्या बोलण्यामुळे आम्ही पुन्हा त्यांना घरी चालू केलेल्या शॉप वर कामासाठी घेतले. हे दिवस फारच बिकट जात होते. नंतर राज्य सरकारने ऑक्टोंबर मध्ये सलोनला परवानगी देण्याची घोषणा केल्यामुळे फार आनंद झाला. सलोन चालू केल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी आम्ही अपॉइंटमेंट सुविधा , ऑनलाइन पेमेंट,बिलिंग सिस्टिम सुरू केली. परंतू गावाकडे सलोन मध्ये सर्व्हिस घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊन जाणे हे लोकांना अंगवळणी नसल्यामुळें आमचा व्यवसाय पुन्हा अडचणीत आला. त्यामूळे एक कर्मचारी (स्टाफ) कमी करावा लागला. मग काही दिवसानंतर येथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु एक शेवटचा प्रयत्न म्हणून, आमच्या सलोन मधील स्वच्छता, आरामदायी वातावरण, वापरात येणारे उत्कृष्ट कंपनीचे प्रॉडक्ट,योग्य देखरेख , अपॉइंटमेंट सुविधा, बिलिंग सिस्टिम,अनुभवी व शिक्षित (Educated) स्टाफ , कोरोनाची खबरदारी इतर सोईसुविधा असल्या कारणाने ग्राहकांना जागरूक करण्यासाठी आम्ही याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडिया (Youtube,Insta,Fb) ला व्हायरल केले. कोरोना येण्यापूर्वी ही या सलोन मध्ये ही स्वच्छता व ईतर सोई सुविधा होत्या त्यामुळेच या सलोनचे रेट थोडेसे जास्त होते हे ग्राहकांच्या लक्षात आले.

2021 च्या शेवटी शेवटी एम एस सलोनला खूप पसंती येत गेली आणि ग्राहकांच्या म्हणण्यानुसार आम्हीं गावाकडील सलोन मधील ब्रँड बनलो. वाढत्या प्रेम आणि प्रतिसादामुळे तसेच ग्राहकांची ग़ैरसोय लक्षात घेता आम्ही,

2022 संपण्यापूर्वीच,पूर्णपणे डिजीटल झालो म्हणजेच ग्राहकांना अपॉइंटमेंट घेण्यासाठी स्वतःचे सुरक्षित (Secure) असे हे ॲप्लिकेशन बनवले. तसेच महेश सरांच्या वाइफ प्रतिक्षा पंडित यांनी नेवासा येथील ब्युटी पार्लर मध्ये 1 वर्षांचा अनुभवा बरोबरच छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध असलेले सॅम अँड जस हेअर अँड मेकअप अकॅडमी (Sam and Jas Hair Makeup Academy) येथे अँडव्हान्स कोर्स करून पुन्हा अनुभवासाठी लैक्मे(Lakme salon) सलोन मध्ये जॉब करत आहे.

लवकरच यांच्या मदतीनें व आम्हाला लाभलेल्या आपल्या प्रेम व प्रतिसादाने आपल्या सेवेकरिता स्री- पुरूषांसाठी सलोन ची (Unisex Salon) दुसरी शाखा उपलब्ध करणार आहोत.