केसांची निगा राखण्यासाठी काही आश्चर्यकारक टिप्स
1) केस धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये. कोमट पाण्यानेच शक्यतो केस धुवावेत.
2) केस धुण्यासाठी बोअरिंगचे(खारे ) पाणी वापरू नये.
3) केस खूप खसखसून धुऊ नयेत. हलक्या हाताने पण स्वच्छ धुवावेत.
4) केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर एक दिवस आड करावा.
केस धुण्यासाठी सल्फेट,पॅराबिन फ्री शॅम्पूचा वापर करावा.
5) शॅम्पू हा केसाला न लावता डोक्याच्या त्वचेला वापरावा.
6) कंडिशनर हे डोक्याच्या त्वचेला न लावता केसाला वापरावे.
7) शॅम्पूचा वापर झाल्यानंतर केसाला कंडिशनर जरूर वापरावे.
8) केस धुताना डोक्यावर केस घेऊन ते एकत्र न धुता मोकळे सोडून मगच धुवावेत.
9) केस धुवून झाल्यानंतर कोरडया पण मऊ कापडाने हळूवार पुसावेत. ओले असल्यास डोक्याला ५ ते ७ मिनिटे
टॉवेल बांधावा
9) ओले केस कधीही विंचरू नयेत. केसांतील गुंता प्रथम बोटांनी सोडवावा.
10)केस विंचरण्यासाठी लांब अंतरावर असलेल्या दात वाला कंगवा वापरावा.
11) केस विंचरण्यासाठी लांब अंतरावर असलेल्या दाताचा कंगवा वापरावा.
12) दिवसभरात दोन ते तीन वेळेस केसात प्रत्येक दिशेने कंगवा फिरवावा.
13) केस विंचरताना केसांच्या शेवटून सुरवात करून हळू हळू वरवर विंचरत जावे.
14) ओले केस घेऊन बाहेर जाऊ नये. तसेच ओले केस करून झोपु नये.
15) बाइक वरती जाताने केसाला कव्हर करावे.
16) ऑइल हे केसांसाठी चांगले नसून ते डोक्याच्या त्वचेसाठी चांगले असते.
17) केसाला सिरम वापरावे. आपणास सिरम वापरायचे नसल्यास मोरोक्कन किंवा अरगण ऑइल वापरावे.
18) आपले बेलशीट व उशीचे कव्हर सॅटिन म्हणजे सिल्कचे वापरावे.
19) केसाला रबर बॅण्ड वापरत असाल तर ते जास्त टाईट न ठेवता थोडेसे लूज ठेवावे.
20) केसावर डायरेक्ट AC चा फ्लो घेऊ नये.
आपण या सर्व टिप्स फॉलो केल्या तर कोंडा होणे ,केस गळणे,केस दुभंगणे या समस्या आपणास
उद्भवणार नाही.
आता हे झाले सुपर फेशिअल म्हणजे बाहेरून काळजी घेण्याचे काम , हो पण एक लक्षात ठेवा की आतून
आपले शरीर चांगले नसेल किंवा आतूनच आपण आनंदी नसाल , आतूनच आपली बॉडी हेल्दी नसेल तर आपण
बाहेरून कितीही प्रयत्न करा, कितीही शरीराला सजवा तरीही ते चांगले होणार नाही …यासाठी शरीराची काळजी घ्या.
– रोज 6 ते 7 तासाची झोप घ्या.
– आपल्या डोक्याला टेन्शन फ्री ठेवा.
– आनंदी राहत चला.
– रोज व्यायाम करा या बरोबरच आहार योग्य आणि वेळेवर घ्या.
आपले केस व त्वचा आपोआपच चांगली होईल.